About Us
अखिल भारतीय महिला मराठा महासंघ
अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था १९८० पासून मराठा समाजाच्या हितासाठी आणि उन्नती करिता कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत मराठा महिलांकरिता अखिल भारतीय महिला या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत मराठा समाजातील महिलांना एकत्रित करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प आणि कार्यक्रम राबविले जातात.,राजमाता जिजाऊ जयंती, शिवजयंती , वधुवर सूचक केंद्र, वधुवर मेळावा, कार्यशाळा, चर्चा सत्रे, पारितोषिक समारंभ, मंगळागौर, क्रांती मोर्चा, तेजस्विनी पुरस्कार, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक आणि समाजाच्या हितासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.,
अखिल भारतीय महिला मराठा महासंघ ही समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी यासाठी एक आधुनिक चळवळ असून संपूर्ण मराठा महिला समाजाकरीता प्रगतीपथावर नेहण्यासाठी कारनीभूत ठरेल.
Marathavadhuvar.org
मराठा समाजातील तरुण तरुणींना आयुष्याचा जोडीदार चांगला मिळवा या हेतूने सुरु केलेले "वधुवर सूचक मंडळ'
मराठा समाजातील तरुण तरुणींना आयुष्याचा जोडीदार मनासारखा आणि आयुष्यभर साथ देणारा मिळावा या हेतूने अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे वधुवर सूचक मंडळ अविरतपणे कार्य करत आहे.
- सर्व वेरिफाइड प्रोफाईल्स
- मराठा समाजातील कुटुंबव्यवस्थेनुसार निवड
- marathavadhuvar.org वर ऑनलाईन प्रोफाइल
- वैयक्तिक मार्गदर्शन आणि लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न
मराठा उद्योजिका
मराठा समाजातील महिला उद्योजकांना व्यवसायात टॅग धरता यावा, यास्थाई विशेष प्रयत्न
मराठा समाजातील महिला उद्योजकांना व्यवसायात टॅग धरता यावा, यास्थाई विशेष प्रयत्न केले जातात.
- मराठा उद्योजिकेसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देणे
- मराठा उद्योजिकांना एकत्र आणणे, मार्गदर्शन करणे
- मराठा उद्योजिकणाच्या व्यवसायाची जाहिरात करणे
- एकमेकांना मदत करून काम करण्याचा विचार समाजात रुजवणे
सामाजिक चळवळ
मराठा समाजाच्या हितासाठी असणाऱ्या प्रत्येक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग
मराठा समाजाच्या हितासाठी असणाऱ्या प्रत्येक सामाजिक चळवळीत, अखिल भारतीय महिला मराठा महासंघाने नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आहे.
- मराठा आरक्षण
- मराठा क्रांती मोर्चा
- अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे मेळावे
- मराठा समाजाच्या हक्कांसाठी समाज जागृती
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या सक्रिय सहभाग घेण्यासाठी आमच्या टीमसोबत संपर्क करा.
अखिल भारतीय महिला मराठा महासंघ ही समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी यासाठी एक आधुनिक चळवळ असून संपूर्ण मराठा महिला समाजाकरीता प्रगतीपथावर नेहण्यासाठी कारनीभूत ठरेल.