अखिल भारतीय मराठा महासंघ कशासाठी?
अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था १९८० पासून मराठा समाजाच्या हितासाठी आणि उन्नती करिता कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत मराठा महिलांकरिता अखिल भारतीय महिला या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत मराठा समाजातील महिलांना एकत्रित करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प आणि कार्यक्रम राबविले जातात.,राजमाता जिजाऊ जयंती, शिवजयंती , वधुवर सूचक केंद्र, वधुवर मेळावा, कार्यशाळा, चर्चा सत्रे, पारितोषिक समारंभ, मंगळागौर, क्रांती मोर्चा, तेजस्विनी पुरस्कार, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक आणि समाजाच्या हितासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.,
अखिल भारतीय महिला मराठा महासंघ ही समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी यासाठी एक आधुनिक चळवळ असून संपूर्ण मराठा महिला समाजाकरीता प्रगतीपथावर नेहण्यासाठी कारनीभूत ठरेल.
मराठा वधुवर
मराठा युवक युवतींना आयुष्याचा जोडीदार योग्य मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणारे मराठा वधुवर सूचक मंडळ, हे सातत्याने ३५ वर्ष अविरतपणे चालणारे अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे वाखाणण्याजोगे कार्य आहे.