अखिल भारतीय महिला मराठा महासंघ

अखिल भारतीय महिला मराठा महासंघ

अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था १९८० पासून मराठा समाजाच्या हितासाठी आणि उन्नती करिता कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत मराठा महिलांकरिता अखिल भारतीय महिला  या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत  मराठा समाजातील महिलांना एकत्रित करण्यासाठी  अनेक प्रकारचे प्रकल्प आणि कार्यक्रम राबविले जातात.,राजमाता जिजाऊ  जयंती, शिवजयंती , वधुवर सूचक केंद्र, वधुवर मेळावा, कार्यशाळा, चर्चा सत्रे, पारितोषिक  समारंभ, मंगळागौर, क्रांती मोर्चा, तेजस्विनी पुरस्कार, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक आणि समाजाच्या हितासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.,

अखिल भारतीय महिला मराठा महासंघ ही समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी यासाठी एक आधुनिक चळवळ असून संपूर्ण मराठा महिला समाजाकरीता प्रगतीपथावर नेहण्यासाठी कारनीभूत ठरेल.

प्रेरणास्रोत

ॲड शशिकांत पवार

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे ज्येष्ठ नेते ॲड शशिकांत पवार.

कट्टर मराठा नेते असले तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती.

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते, अशी त्यांची ख्याती होती. शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरु झाली. सन 1981 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे 1964 पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते.

अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर 1990 च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी 1980 पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

आपली वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली होती. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम ही संस्था वाढवण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच मराठा तरुणी आणि महिला सुद्धा एकत्र येऊन रणरागिणी प्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी हातभार देतील हे त्यांना माहीत होते., म्हणून त्यांनी या अखिल भारतीय महिला मराठा महासंघाची उभारण्या करण्यासाठी प्रोत्साहित केले.

पहिल्या अध्यक्ष - सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ यांनी केवळ अनाथांसाठीच नव्हे, तर समाजातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी कार्य केले.

विशेषतः मराठा महिलांसाठी त्यांचे योगदान खालीलप्रमाणे आहे: 

आत्मनिर्भरतेचा आदर्श: सिंधुताईंनी स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने कठीण परिस्थितीवर मात केली. त्यांनी महिलांना शिकवले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला हार मानता कामा नये आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे.

शिक्षणासाठी प्रोत्साहन: सिंधुताईंनी शिक्षणाचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले. त्यांनी महिलांना शिकण्यासाठी आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रेरित केले.

महिलांना संरक्षण: त्यांनी अनाथांसोबतच अनेक महिलांना त्यांच्या आश्रमात आधार दिला, ज्यांना कौटुंबिक हिंसा किंवा अन्यायाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्यासाठी त्यांनी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले.

स्वावलंबनाचा संदेश: सिंधुताईंनी महिलांना स्वावलंबी होण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी दाखवून दिले की कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताही समाजासाठी मोठे योगदान देता येते.

महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा: सिंधुताईंच्या संघर्षमय जीवनप्रवासाने मराठा समाजातील महिलांना स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दाखवून दिले की महिलांमध्ये नेतृत्व आणि समाजसेवेची क्षमता आहे. 

सिंधुताई सपकाळ यांचे कार्य मराठा महिलांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना आत्मविश्वासाने उभे राहण्याची दिशा मिळाली आहे.

आ. श्री. दिलीपसिंग दादा जगताप

ऑल इंडिया मराठा फेडरेशनचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस, आदरणीय आ. श्री. दिलीपसिंग दादा जगताप साहेब

ऑल इंडिया मराठा फेडरेशनचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस, आदरणीय आ. श्री. दिलीपसिंग दादा जगताप साहेब यांना संस्थेच्या कार्याची खऱ्या अर्थाने बॅकबोन मानले जाते. त्यांनी नेहमीच समाजहितासाठी आणि विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

अखिल भारतीय महिला मराठा महासंघासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि पाठिंब्याचा सतत लाभ होत असतो. महिलांसाठी स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या क्षेत्रांमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, स्वयंरोजगार उपक्रम, आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची आखणी करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

संस्थेतील कोणताही उपक्रम असो, दादा जगताप साहेबांचा पुढाकार, आधार, आणि प्रेरणा यामुळेच प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतो. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे संस्थेचे पदाधिकारी नव्या संधी आणि वाटचालीसाठी सदैव प्रेरित होतात. त्यांच्या सहकार्यामुळे महासंघाच्या उद्दिष्टपूर्तीला अधिक बळ मिळते आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सतत नवी दिशा मिळते. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी उभारलेल्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत.

Marathavadhuvar.org

मराठा समाजातील तरुण तरुणींना आयुष्याचा जोडीदार चांगला मिळवा या हेतूने सुरु केलेले "वधुवर सूचक मंडळ'

मराठा समाजातील तरुण तरुणींना आयुष्याचा जोडीदार मनासारखा आणि आयुष्यभर साथ देणारा मिळावा या हेतूने अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे वधुवर सूचक मंडळ अविरतपणे कार्य करत आहे.

मराठा उद्योजिका

मराठा समाजातील महिला उद्योजकांना व्यवसायात टॅग धरता यावा, यास्थाई विशेष प्रयत्न

मराठा समाजातील महिला उद्योजकांना व्यवसायात टॅग धरता यावा, यास्थाई विशेष प्रयत्न केले जातात.

सामाजिक चळवळ

मराठा समाजाच्या हितासाठी असणाऱ्या प्रत्येक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग

मराठा समाजाच्या हितासाठी असणाऱ्या प्रत्येक सामाजिक चळवळीत, अखिल भारतीय महिला मराठा महासंघाने नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आहे.

अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या सक्रिय सहभाग घेण्यासाठी आमच्या टीमसोबत संपर्क करा.

अखिल भारतीय महिला मराठा महासंघ ही समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी यासाठी एक आधुनिक चळवळ असून संपूर्ण मराठा महिला समाजाकरीता प्रगतीपथावर नेहण्यासाठी कारनीभूत ठरेल.